कोपरगाव :- कोपरगाव येथे मुख्य शाखा असलेल्या व राज्यातील ग्रामीण भागातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या , ११०० कोटी रुपयांहून अधिक ठेवी असलेल्या समता नागरी पतसंस्थेच्या छ. संभाजी नगर शहरातील पुंडलिक नगर येथे नव्या शाखेचे उदघाटन उत्साहात पार पडले .
या शाखेचे उदघाटन भाजपचे नगरसेवक विश्वनाथ स्वामी , लोकमत मीडिया ग्रुप छ . संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष बालाजी मुळे , ज्ञानेश्वर खर्डे , भगवान तिळकरी , यांचे हस्ते करण्यात आले .उदघाटन समारंभाच्या अध्यक्ष पदी चेअरमन ओम प्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते .
या वेळी बोलताना संस्थचे चेयरमन काका कोयटे म्हणाले कि समता पतसंस्था हि केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सर्व सामान्यांच्या स्वप्नांना बाळ देणारी सहकाराची चळवळ आहे . गेल्या ४० वर्षाच्या वाटचलित प्रामाणिकपणा , पारदर्शकता , आणि सभासदांचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल आहे .पुंडलिक नगर येथे सुरु झालेल्या या नव्या शाखेमुळे छ्त्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना आधुनिक ,सुलभ व विश्वासहार्य बँकिंग सेवा एकछत्राखाली उपलब्ध होणार आहे .
या प्रसंगी संस्थेचे व्हा. चेयरमन अरविंद पटेल , संचालक कचरू मोकळ, दीपक अग्रवाल , गिरीश सोणेकर , श्वेता अजमेरे , सुहासिनी कोयटे , भरत अजमेरे , ज्योत्सना पटेल ,उमेश वाळेकर , प्रमोद लोणगावकर , रवी शिंगणापुरे , समता संस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड , यांचे सह छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
